*कोकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू*
*फोंडाघाट ः गणेश इस्वलकर*
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी, फोंडाघाटच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाटमध्ये चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रथम वर्ष कला व वाणिज्य वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे.
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाटमध्ये प्रथम वर्ष कला व प्रथम वर्ष वाणिज्य या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया स्वतंत्रपणे राबवण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून अर्ज भरून बारावीचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, वर्गवारीप्रमाणे इतर कागदपत्रे महाविद्यालयात जमा करून आपला प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत यांनी केले आहे.
फोंडाघाट महाविद्यालय हें नॅक कडून *बी* मानांकन प्राप्त असून शासन स्तरावरील अनेक पुरस्कार प्राप्त महाविद्यालयाने केलेले आहेत. विद्यापीठाची कायमस्वरूपी संलग्नता असून यू.जी.सी.2f व 12B ही मान्यता आहे. महाविद्यालयाला सुसज्ज इमारत असून, क्रीडा व कला प्रकारात विद्यापीठ स्तरावर नावलौकिक मिळवलेला आहे. स्पर्धा परीक्षा व रोजगार स्वयंरोजगार याविषयी वैयक्तिक माहिती देणारा विभागही कार्यरत आहे. महाविद्यालयाचा तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग कार्यरत असून एन.सी.सी., एन.एस.एस. डी.. एल. एल. ई.हे समाजाभिमुख विभागही चालवले जातात. महाविद्यालयात ग्रंथालयात अभ्यासक्रमास व्यतिरिक्त संदर्भ ग्रंथांचा खजिना आहे. आर्थिक अडचणी मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने फी भरण्याची सवलत महाविद्यालयातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे.
कोरोणाच्या काळातही महाविद्यालयाने ऑनलाईन नियमित तासिका घेतल्या. शिवाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रे सातत्याने घेतली आहेत. अशा नेहमी उपक्रमशील असण्यात असणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत 9422137252, प्रवेश विभाग प्रमुख डॉ.बालाजी सुरवसे 9421237365 व कार्यालयीन प्रमुख दीपक सावंत 9423053337 या क्रमांकावर संपर्क साधावा.