*कोकण Express*
*भारत विरुद्ध इंग्लंड उद्यापासून दुसरी कसोटी; ‘या’ खेळाडूला अंतिम अकरा मध्ये संधी?…..*
पावसामुळं इंग्लंडविरोधातील पहिला कसोटी सामना अनिर्णित झाल्यानंतर उद्यापासून दुसरी कसोटी खेळली जाणार आहे. लॉर्ड्सवर खेळल्या जाणाऱ्या या दुसऱ्या कसोटीत दोन्ही संघांमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.
पहिल्या कसोटीत इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर रोरी बर्न्स आणि डॉमिनिक सिब्ली दोघेही चांगली खेळी करु शकले नाहीत. त्यामुळं दोघांपैकी एकाला डच्चू मिळू शकतो.
सोबतच बेन स्टोक्स आणि क्रिस वोक्सच्या अनुपस्थितीत मोईन अलीला संघात स्थान मिळू शकतं. भारताकडून देखील आर अश्विनला दुसऱ्या कसोटीत संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
*दोन्ही संघामध्ये ‘हे’ बदल होण्याची शक्यता*
■ इंग्लंडच्या संघात युवा ओपनर हसीब हमीदचं पुनरागमन होऊ शकतं.
■ तसंत अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला देखील अंतिम अकरा मध्ये स्थान मिळू शकतं.