*कोकण Express*
*भाजपा जिल्हा सरचिटणीस राजन चिके आणि तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर यांनी घेतली नारायण राणेंची दिल्लीत भेट*
*कणकवली ः प्रतिनिधी*
केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणेंचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ आॕगस्ट रोजी आगमन होणार असून या आधीच त्यांना दिल्लीत जाऊन अनेक राणेसमर्थक, भाजपा पदाधिकारी शुभेच्छा देत आहेत. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राजन चिके आणि तालुका सरचिटणीस तथा असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनीही नुकतीच दिल्ली गाठली असून नारायण राणेंना शुभेच्छा दिल्या आहेत. या भेटीत त्यांनी विकासात्मक कामांबाबत नारायण राणे यांना निवेदन सादर केले. तसेच विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा केली.
